“पडवळ बाहूचे पसरुनी पंख, दूध पाजणारासी घेतो डंख..” ; भाजपची कवितेतून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असल्याचे दिसत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली आणि त्यांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ असा केला. या टीकेचा पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप ट्वीट केली आणि आठ मुद्द्यांमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. परंतु, आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक कविता सादर करत ‘कलंक’ कसा ओळखावा? हे वर्णन केले आहे.
उद्धव ठाकरेंना उद्देशूनच ही कविता त्यांनी पोस्ट केली आहे. केशव उपाध्ये यांनी पोस्ट केलेली कविता पुढीलप्रमाणे…
पडवळ बाहूचे पसरुनी पंख
दूध पाजणारासि घेतो डंख॥
उच्च कोटीचा मानसिक रंक
तो येक वोळखावा कलंक॥
कुटुंबाची करितो धन
साधा देह सडके मन॥
कर्तृत्व जया अंगी निरंक
तो येक वोळखावा कलंक॥
पूर्वायुष्यी बहु केला राडा
घरी बैसोनि हाकला गाडा॥
सत्ता गमावुनि झाला खंक
तो येक वोळखावा कलंक॥
कलंकाचे कैसे बोलणे
कलंकाचे कैसे चालणे॥
दिसणे हसणे जयाचे
कलंकचि असे॥
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नागपुरात कार्यकर्त्या मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला देवेंद्र फडणवीस ‘कलंकीचा काविळ’ म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कविताच ट्वीट करत उत्तर दिले आहे.
पडवळ बाहूचे पसरुनी पंख
दूध पाजणारासि घेतो डंख॥
उच्च कोटीचा मानसिक रंक
तो येक वोळखावा कलंक॥कुटुंबाची करितो धन
साधा देह सडके मन॥
कर्तृत्व जया अंगी निरंक
तो येक वोळखावा कलंक॥पूर्वायुष्यी बहु केला राडा
घरी बैसोनि हाकला गाडा॥
सत्ता गमावुनि झाला खंक
तो येक वोळखावा कलंक॥कलंकाचे…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 11, 2023
“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.





