स्फोटाचा आवाज अन् लोकांची पळापळ; दिल्ली बॉम्बस्फोटानंतरचा CCTV फुटेज समोर

Delhi Blast CCTV Footage | दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सोमवारी, 10 नोव्हेंबर रोजी स्फोट झाला. यात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता परिसरात त्याचे हादरे जाणवले. यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून तपासासाठी अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.
स्फोटापूर्वीच्या काही वेळेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यात एक आय-२० कार गर्दीच्या ट्रॅफिकमधून जाताना दिसत आहे. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर काळा मास्क घातलेला जो व्यक्ती दिसत आहे, तो दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचे सांगितले जात आहे.
फुटेजनुसार, कार चालवणाऱ्या व्यक्तीने आपला चेहरा काळ्या रंगाच्या मास्कने झाकलेला होता. तपास यंत्रणा आता या कारचे आणि मास्क घातलेल्या ड्रायव्हरचे ओळख पटवण्यासाठी तांत्रिक आणि मानवी गुप्तचर माहितीचा वापर करत आहेत. Delhi Blast CCTV Footage |
लोकांची एकच पळापळ सुरू
तर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा स्फोट झाला ते ठिकाण वर्दळचे होते. याठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मात्र स्फोटाचा आवाज होताच लोकांची आराडाओरड आणि पळापळ सुरू झाल्याचे यात दिसते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.
प्राथमिक गुप्तचर अहवालातून असे दिसते की, गर्दीच्या भागात कार आणण्यापूर्वी त्यात स्फोटके भरली गेली. सायंकाळी ६:५२ वाजता कारमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे आग लागली आणि आजूबाजूच्या गाड्याही त्याच्या विळख्यात आल्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की स्फोट इतका जोरदार होता की रस्त्यावरील दिवे बंद पडले आणि आगीच्या ज्वाला अनेक फूट उंच गेल्या, सध्या या स्फोटामागील कारणांचा तपास सुरू आहे.
कार कोणाची होती?
ज्या हुंडई आय२० कारमध्ये स्फोट झाला, ती खरेतर मोहम्मद सलमानची होती, पण त्याने ती नदीमला विकली. नंतर त्याने ती फरीदाबादच्या एका जुन्या कार डीलर रॉयल कार झोनला विकली. त्यानंतर ती तारिकने विकत घेतली आणि नंतर उमरने ताब्यात घेतली.
VIDEO | Delhi: CCTV footage from near the blast site shows people running for safety. A high-intensity explosion ripped through a slow-moving car at a traffic signal near the Red Fort metro station on Monday evening, killing at least nine people and injuring several others.… pic.twitter.com/Fbmfzi21g7
— Press Trust of India (@PTI_News) November 11, 2025
सूत्रांच्या मते, ही कार कथितपणे जम्मू-काश्मीरच्या पुलवामाच्या रहिवासी तारिकने विकत घेतली होती, ज्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तपासकर्ते फरीदाबादमधील एका दहशतवादी मॉड्यूलशी त्याच्या संबंधांची चौकशी करत आहेत. Delhi Blast CCTV Footage |
हेही वाचा :
“दहशतवादाला समर्थन करणाऱ्यांना देशात जागा नाही”; दिल्ली बॉम्बस्फोटानंतर गडकरींची प्रतिक्रिया




