बॉईज ३ मधील ‘चांद माथ्यावरी’ गाण्याने लावली सोशल मीडियावर आग

मुंबई – बॉईज सिरीजने प्रेक्षकांना जणू वेडच लावले आहे. ‘बॉईज ३’ चित्रपटाची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन पुन्हा एकदा आलीय ‘बॉईज ३’ची टीम. ‘मनात शिरली’, ‘मस्त मौला’, ‘लग्नाळू २.०’ ह्या धमाल गाण्यांनंतर आता नुकतेच ‘चांद माथ्यावरी’ हे प्रमोशनल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा रांगडा आवाज आणि संगीत लाभलेलं आहे. कमाल अश्या हुकस्टेप असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि संजीव हौलदार यांनी केलेले आहे. सर्व सोशल मिडियावर या गाण्याची चलती पाहायला मिळत आहे. सर्वांना ठेका धरायला लावणार अवधूत गुप्तेच ‘चांद माथ्यावरी’ हे गाणं सध्या चांगलच लोकप्रिय होतंय.
‘बॉईज ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

