कोरोनामुळे सिक्युरिटी गार्डच्या मृत्यूनंतर कुटुंबाला सोसायटीने केली आर्थिक मदत
Updated On:

वाघोली – वाघोली (ता. हवेली) येथील ऑक्सी व्हॅली फेज दोन को-ऑपरेटीव्ह सोसायटी मधील सिक्युरीटी गार्ड प्रशांत धनवडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. धनवडे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आणि घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सोसायटीच्या वतीने त्यांच्या कुटीबीयांना सोसायटी व सभासदांच्या वतीने दोन लाख चार हजार चारशे रुपये आर्थिक मदत करण्यात आली.मदतीचा धनादेश कुटुंबीयांकडे देण्यात आला.
यावेळी वाघोली चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शांताराम कटके, संतोष जाधव, युवराज निपाणकर, सुरज पाटील, देविदास गाडे, अक्षय गाडे, अबिद शेख, डॉ. शेख, अनिल यादव, सोमनाथ भैस, अभिजित पांडे, धीरज छाब्रा, अमोल कोटलवार, गणेश श्रीवत, सीताराम व्हावळे, प्रकाश महाडिक सोसायटी धारक उपस्थित होते.





