‘आप’चा धडाका! पंजाबात 26 हजार 454 सरकारी पदे भरण्याचा निर्णय
Updated On:

चंदीगड – पंजाब सरकारने आज काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. त्यात सरकारच्या विविध विभागातील 26454 रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे.
तसेच राज्यात घरपोच रेशन पुरवण्याचाही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्यातील आमदारांना आता एकच पेन्शन देण्याचाहीं निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या एखादा आमदार जितकेवेळा विधानसभेवर निवडून गेला असेल तितक्या प्रमाणात त्याला वाढीव पेन्शन मिळत होंती. ती आता बंद करण्यात आली आहे. त्यासाठी ‘एक आमदार, एक पेन्शन’ योजनेलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
या योजनेअंतर्गत पंजाब सरकार आमदारांचा आयकर भरणार नाही. या खेरीज आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही काही निर्णय घेण्यात आले आहेत.




