Nevasa : अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद! चौदा तालुके दुष्काळग्रस्त
Nevasa : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये पडलेला मोठा खंड हा खरीप पिकांसाठी जीवघेणा ठरला सोयाबीन, कापूस, मका, तूर या पिकांनी शेतात माना टाकलेल्या होत्या.

नेवासे : अखेर राज्य शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखत जिल्ह्यातील चौदाही तालुके अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहता हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले आहेत. राज्यातील २६५ तालुक्यांच्या यादीत अहिल्यानगरचे सर्व १४ तालुके समाविष्ट झाले असल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची काळी छाया अधिकच गडद झालेली आहे.
केवळ पाऊस कमी नाही, तर पिकेही गेली!
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये पडलेला मोठा खंड हा खरीप पिकांसाठी जीवघेणा ठरला सोयाबीन, कापूस, मका, तूर या पिकांनी शेतात माना टाकलेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली पेरणी मातीत गेलेली आहे परिणामी शासनाने तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश देवून तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाकडून बांधावर जाऊन पाहणी करत पंचनाम्याचा सोपस्कार पूर्ण केलेला काही ठिकाणी अद्यापही पंचनामे करणे सुरु आहेत.
जिल्ह्याचे किंगमेकर पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे ही बाब स्पष्ट अधोरेखित होत आहे.
शासनाच्या सवलती काय?
दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आपोआप १२ सवलती लागू झाल्या आहेत. जमीन महसूल पूर्ण माफ पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन, कर्ज वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट शालेय – महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ, रोहयोची कामे वाढवणे आणि टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा याबाबत उपाययोजना करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरु असल्याचे वृत्त हाती आलेले आहे.
आता खरी गरज पाणी बचतीची चाणक्ष वृत्ती!
सरकारी मदत हा तात्पुरती मलमपट्टी आहे पण खरा उपाय आपल्याच हातात आहे दुष्काळावर मात करायची असेल तर प्रत्येकाने पाणी बचतीचा संकल्प करायला हवा, शेतीत ठिबक आणि तुषार सिंचनाशिवाय पर्याय नाही उपलब्ध पाण्यात कमी पाण्यावर येणारे चारा पिके आणि हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करण्याची गरज असून घरात नळाला तोटी लावून एक थेंबही पाणी वाया जाऊ न देण्याची गरज असून गावात जलजीवन मिशनची अपूर्ण कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.
१९७२ च्या दुष्काळापेक्षाही २०२६ चा दुष्काळ अधिक तीव्र असल्याची भावना शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर व्यक्त केलेली आहे. अशा वेळी आता पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापर करणे हाच अहिल्यानगरकरांच्या दृष्टीने संकटावर मात करण्यासाठी पाणी बचतीचा एकमेव मार्ग आहे पाणी वाचले तरच गाव वाचेल आणि गाव वाचले तरच शेती वाचेल? यासाठी दुष्काळावर खरंच मात करण्यासाठी शासनाबरोबरच आता प्रत्येक सुजाण नागरिकांनी पुढे येऊन दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.





