करोनाची दुसरी लाट ओसरली; नवीन बाधितांची संख्या एक लाखाच्या खाली
Updated On:

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 92 हजार 596 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशभरातील एकूण बाधितांचा आकडा आता तीन कोटींच्या दिशेने जाताना दिसत आहे.
देशातील एकूण करोना बाधितांचा आकडा आता 2 कोटी 90 लाख 89 हजार 69 इतका झाला आहे. आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी करोना बाधितांचा आकडा एक लाखाच्या आत राहिला. तथापी आजही मृतांचा आकडा दोन हजारांच्यावरच नोंदवला गेला आहे.
गेल्या 24 तासांत एकूण 2219 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता 3 लाख 53 हजार 528 इतकी झाली आहे. दरम्यान देशातील करोनाचा रिकव्हरी रेट आता 94.55 टक्के इतका झाला आहे.





