आचारसंहितेच्या धास्तीने 48 तासांत स्थायीची दुसरी सभा

मंजुरीचा सपाटा : 38 कोटींच्या खर्चाला मंजुरी

पिंपरी – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या धास्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने विशेष सभांचा सपाटा लावला आहे. 48 तासांत दुसऱ्यांचा विशेष सभा घेण्याचा विक्रम समितीने केला आहे. सोमवारी झालेल्या विशेष सभेत सुमारे 38 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये स्थापत्य विषयक कामांचा सर्वाधिक समावेश आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. मडिगेरी यांच्या हाती स्थायी समितीची सूत्रे येताच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. यामध्ये तब्बल दोन महिने कोणतेही निर्णय घेता आले नाहीत. आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. गणेश विसर्जनानंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पुन्हा दोन महिने स्थायी समितीच्या सभांना आचारसंहितेचा अडसर येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे स्थायी सभापती मडिगेरी यांनी सभांचा धडाका लावला आहे. बुधवारी (दि. 4) साप्ताहिक बैठक पार पडल्यानंतर शनिवारी (दि. 7) महापालिकेच्या दोन तहकूब सभा असतानाही स्थायी समितीची विशेष सभा उरकती घेण्यात आली. यामध्ये सव्वाशे कोटींचे दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या विशेष सभेला 48 तास पूर्ण होत नाही तोच आज पुन्हा विशेष सभा घेण्यात आली. सुमारे 37 कोटी 80 लाख रुपये खर्चाचे 34 विषय सभेसमोर मंजुरीसाठी होते. यामध्ये स्थापत्य विषयक 28 कामांचा समावेश आहे.

यामध्ये सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या पूर्णानगर-घरकुल प्रभागात रस्ते विकसित करण्यासाठी 23 कोटी 76 लाख रुपये खर्चाचा समावेश आहे. चिखली प्रभागातील देहू-आळंदी रस्ता अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी 49 लाख 74 हजार, प्रभाग क्रमांक 12 मधील तळवडे गावठाण रस्ता खडी मुरुमीकरण करण्यासाठी सुमारे 45 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 10 मधील रस्त्याचे हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी 44 लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील मासुळकर कॉलनी भागात स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी 31 लाख 67 हजार रूपये, प्रभाग क्रमांक 20 संत तुकारामनगर येथील सावता माळी उद्यान परिसरात स्थापत्य विषयक कामांसाठी 25 लाख 30 हजार, क्रीडा प्रबोधिनी (स्पोर्ट स्कूल) विद्यालयास एक वेळ भोजन पुरवठा करण्यासाठी सुमारे 46 लाख 24 हजार रूपये, अशा कामांना स्थायीने “हिरवा कंदील’ दाखविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)