‘काश्मीर टूर’चा दुसरा दिवस ठरला ‘शेवट’चा ; पहलगाम हल्ल्यापूर्वी मंजुनाथ यांचा पत्नीसोबतचा शेवटचा व्हिडिओ समोर

Pahalgam attack । काश्मीर खोऱ्यात पर्यटनासाठी आलेले कर्नाटकातील शिवमोगा याठिकाणचे रहिवासी मंजुनाथ आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची सहल मंगळवारी एका भयानक दहशतवादी हल्ल्यात रूपांतरित झाली. या हल्ल्यात मंजुनाथचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी आणि मुलगा थोडक्यात बचावले आहेत.
शेवटच्या व्हिडिओमध्ये दोघेही आनंदी Pahalgam attack ।
हल्ल्याच्या काही तास आधी मंजुनाथचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते श्रीनगरच्या प्रसिद्ध दल सरोवरावर शिकारा राईडचा आनंद घेत आहे. व्हिडिओमध्ये ते त्याच्या पत्नीसोबत दिसत आहेत. ‘इंडियन ट्रॅव्हल स्टोअर्स’च्या वतीने टूर बुक केल्याबद्दल आणि शिकारा चालवल्याबद्दल मोहम्मद रफिकचे आभार मानत आहे.
J&K : पहलगाम में आतंकी हमले में मारे गए कर्नाटक के मंजूनाथ की आखिरी Video 💔
पत्नी पल्लवी ने एक चैनल को बताया– “मैंने आतंकियों से कहा, मेरे पति को मार दिया, मुझे भी मार दो”
इस पर आतंकी बोले– “तुम्हें नहीं मारेंगे, जाओ मोदी को बता दो” pic.twitter.com/ZlqUYiNEwg
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 22, 2025
व्हिडिओमध्ये ते अत्यंत आनंदी दिसून येत आहेत. तसेच “आम्ही भारतीय ट्रॅव्हल स्टोअर्समधून काश्मीरला भेट देण्यासाठी आलो आहोत. शिकारा राईड खूप छान होती… सगळं छान वाटलं.” असे म्हणताना दिसत आहेत.
काही तासांनंतर, प्रचंड विध्वंस Pahalgam attack ।
व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर काही तासांतच, पहलगामजवळ एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यात मंजुनाथचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला, जेव्हा अनेक पर्यटक घोडेस्वारी आणि स्थानिक जेवणाचा आस्वाद घेत होते. हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला.
पल्लवीने सांगितले की, हल्ल्यादरम्यान गोळी लागल्यानंतर मंजुनाथचा लगेचच मृत्यू झाला. त्यानंतर पल्लवी यांनी “माझ्या पतीला माझ्यासमोर गोळ्या घालण्यात आल्या… मी त्याला एअरलिफ्ट करा, वाचवा असे ओरडले… पण त्याला वाचवता आले नाही. पल्लवीने दावा केला की दहशतवाद्यांनी तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती, पण नंतर तिला सांगितले की तू जाऊन मोदींना सांग की आम्ही हे केले आहे.
आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स भारत दौऱ्यावर असताना हा हल्ला झाला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने काश्मीरला धाव घेतली आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.





