Satara | प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधल्याचे समाधान

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा- जावळी मतदारसंघात प्रत्येक गावात, वाडी- वस्तीवर विकासगंगा पोहचली आहे. जावली तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना पर्यटनवाढ आणि त्यातून व्यवसायवृद्धी, रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने विविध रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण, काँक्रीटीकरण केले जात आहे.
मतदारसंघाचा विकास साधताना ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामे मार्गी लावली आहेत. असंख्य कामे पूर्ण झाली आहेत तर, अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधता आला, याचे मनस्वी समाधान आहे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आनेवाडी, ता. जावळी येथे महात्मा फुले विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उदघाटनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते दादा पाटील, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, विभागीय विकास अधिकारी अण्णासाहेब फरांदे, डॉ. प्रमोद फरांदे, सरपंच वैशाली फरांदे, उपसरपंच अमित फरांदे, डॉ. निरंजन फरांदे, सोसायटीचे चेअरमन विवेक पवार, व्हा. चेअरमन विजय फरांदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जावली तालुक्यात आजअखेर कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. माझे आणि जावलीकरांचे आपुलकीचे, जिव्हाळ्याचे असे अतूट नाते आहे.
प्रत्येक गावाचीच नव्हे तर, प्रत्येक नागरिकाची समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नेहमी करत असतो. आनेवाडी गावातही अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथील प्रत्येक समस्या सोडवण्यात येईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ सभासद महादेव फरांदे, ऍड. मनोहर फरांदे, शेखर फरांदे, रघुनाथ फरांदे, सोसायटीचे संचालक बाळासाहेब पाटील, साहेबराव फरांदे, रमेश फरांदे, सुरेश फरांदे, कल्याण फरांदे, संकेत फरांदे यांच्यासह सर्व आजी- माजी संचालक, विविध पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या





