शिवसेनेचा भगवा फडकणारच

नितीन बानुगडे पाटील : मी महाराष्ट्र निश्‍चय मेळावा

 आहे, दरम्यान राज्यात कॉंग्रेस आघाडीचे टांगा पलटी घोडे फरार झाले आहेत. पण येणाऱ्या निवडणूकीत ते जातीचे विषय पेरतील. त्यामुळे सावधान रहा असा इशारा शिवसेना उपनेते नितीन बानुगडे यांनी दिला.

शिवसेनेच्यावतीने पटेल मंगल कार्यालयामध्ये मी महाराष्ट्र निश्‍चय मेळाव्यात मार्गदर्शन करताना बानुगडे पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

राज्याच्या, देशाच्या हितासाठी तरुणांनी राजकारणात आलेच पाहिजे परंतु राजकारणात आल्यानंतर मी निवडणूक लढलीच पाहिजे मी आमदार झालोच पाहिजे , मंत्री झालोच पाहिजे असे नाही प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षात आपली वर्तुळे निश्‍चित करून घेतली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सर्व मावळे होते. ते कधी शिवाजी महाराजांच्या जागी बसण्याची ईच्छा बाळगत नव्हते. शिवाजी महाराज होते म्हणून मावळे होते आणि मावळे होते म्हणून शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले.असे उदाहरण देत सध्या अनिल राठोड आहेतच त्यांचे पूर्ण होऊ द्या मग तुमचे बघा असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना उपनेते नितीन बानुगडे यांनी नगरमधील पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना लगावला.

महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे व्यापक विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. मी महाराष्ट्र या संकल्पनेतून आपल्याला आता महाराष्ट्राचा विकास हेच स्वप्न घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी महत्त्वाची आहे.

सध्या अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत आहे.सर्वसामान्य मेटाकुटीला आलेला आहे. राज्यात नऊ हजार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत पण या ठिकाणी 68% लोक शेती करता त्या राज्यात अवघी चार कृषी विद्यापीठे आहेत. शेतकरी आत्महत्या का करतो ? याचा कुणी कधी विचार केला काय? शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्यामुळे मी महाराष्ट्र… मी शेतकरी अशी भूमिका घेऊन आपल्या वाटचाल करायची असल्याचेही ते म्हणाले. रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र कधी होणार हा खरा प्रश्‍न आता विचारला जात आहे. महाराष्ट्र समृध्द करायचा तर प्रत्येकाच्या हाताला काम, रोजगार दिला पाहिजे. या प्रसंगी अनिल राठोड म्हणाले, कॉंगेस – राष्ट्रवादी आघाडीवरचा जनतेचा विश्‍वास उडालेला आहे. हे पक्ष आता बाजुला फेकले गेले आहे. आगामी काळात नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाला झटावे लागणार आहे त्यासाठी शिवसेनेचे विचार घेऊन वाटचाल करायची आहे असे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)