शेअर बाजारातील तेजीनंतर रुपया देखील वधारला

मुंबई – शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणुकीच्या जोरावर तसेच वाढलेल्या परदेशी गुंतवणुकीमुळे आज रुपया ४० पैशांनी वधारून ६८.७४ रुपये प्रति डॉलर वर बंद झाला. शेअर बाजारातील परदेशी गुंतवणुक आणि रोख्यांच्या खरेदीमुळे रुपयाचा दर डॉलर समोर मजबूत झाल्याचे सांगण्यात आले. रिजर्व बँकेने दुसऱ्या डॉलर आणि रुपयाच्या अदला बदलीची घोषणा केल्याने त्याचाही सकारात्मक प्रभाव दिसून आला.

आज परदेशी चलन मुद्रा बाजारात रुपया ६९.३२ वर उघडला. मात्र नंतर रुपयात तेजी येत डॉलरच्या तुलनेत ६८.७० या वरच्या स्तरावर पोहचला होता. त्यानंतर बाजार बंद होताना किंचितशी घसरण होऊन ४० पैशानी वधारत ६८.७४ रुपये प्रति डॉलर वर बंद झाला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.