खेड शिवापूर -शिवापूर (ता.हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाफसाठी उभारलेल्या निवासाचे सुमारे अडीच हजार चौरस फुटाचे छत जमीनदोस्त झाले, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी (दि. 4) झालेल्या चक्रीवादळाचा प्रभाव ग्रामीण भागात दिसून आला. जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून सदर निवासाच्या डागडुजीचे काम सुमारे एक वर्ष तीन महिन्यांपूर्वी झाले आहे. निवास इमारतीचा स्लॅबमधून पाणी मोठ्या प्रमाणात गळत असल्याने त्यावर पत्र्याचे शेड टाकण्यात आले होते, घटना घडण्यापूर्वी महावितरण विभागाचे अभियंता शैलेश गिते यांनी सर्वच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला असल्याने मोठी दुर्घटना टळली. काही ठिकाणी टपऱ्या उलट्या झाल्या होत्या. तर काही ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने झाडे उन्मळून पडली होती.