नव्या विषाणुचा धोका गंभीर; वेळीच उपाययोजना आवश्यक; राहुल गांधींचं मोदी सरकारला आवाहन
Updated On:

नवी दिल्ली – करोनाचा जो नवीन विषाणु अवतरला आहे त्याचा गंभीर धोका देशाला होऊ शकतो. त्यामुळे सरकारने त्या विषयी वेळीच उपाययोजना करून देशाला लसीची सुरक्षा द्यावी असे आवाहन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जगाला करोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणुचा धोका उद्भवला असल्याचा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रीया नोंदवली आहे. लसीकरणाच्या संबंधात योग्य आकडेवारी जारी होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
केवळ एका माणसाच्या फोटोखाली वाईट आकडेवारी देऊन वस्तुस्थिती बराच काळ लपवणे योग्य ठरणार नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो सध्या लावला जात आहे त्या संबंधात त्यांनी ही टीका केली आहे.





