नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सीबीआयच्या हातावर तुरी देऊन गायब होण्यात यशस्वी झालेला स्वयंघोषित ‘बाबा’ वीरेंद्र देव याच्या नावे आज सीबीआयने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. गतवर्षी काही मुलींना जबरदस्तीने आपल्या नवी दिल्ली येथील आश्रमात बंदी बनवून ठेवणाऱ्या वीरेंद्र देव याच्याबाबत सीबीआयला माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल केले होते.
मात्र गेल्यावर्षभरापासून हा स्वयंघोषित बाबा फरार झाला असून आता त्याचा मागोवा काढण्यासाठी सीबीआयकडून त्याच्याबाबत माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस देणार असल्याचे घोषित करण्यात आलं आहे.
CBI has announced Rs 5 lakh reward for anyone who gives information on whereabouts of self styled godman Virendra Dev Dixit. CBI had last year registered 3 cases against Dixit after several girls were allegedly kept under illegal confinement at his ashram in Rohini,Delhi
— ANI (@ANI) April 3, 2019