श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न

आळंदी – श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज, आळंदी मध्ये शिक्षक म्हणून २६ वर्ष, पर्यवेक्षक म्हणून ५ आणि प्राचार्य म्हणून ५ वर्ष अशी एकूण ३६ वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवेरूपी योगदान देणारे तसेच आपल्या सेवा कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात एक आदर्श नागरिक घडविणारे प्राचार्य दीपक मुंगसे यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दीपक मुंगसे यांनी शालेय जबाबदारी सांभाळत आपले कर्तव्य पार पाडत मुलगी शुभदा व मुलगा शुभम यांना उच्च शिक्षित बनविले असून शुभम कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच शाळा व घराची जबाबदारी सांभाळत ते त्यांच्या वाड-वडिलांनी सुरू केलेली रोकडोबा दादा दिंडी (रथापुढे क्रमांक २०, आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी) गेल्या २२ वर्षापासून वारसा चालवत आहेत.
दीपक मुंगसे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन समाजातील वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा अनेक संस्थांकडून १५ विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. तसेच त्यांना वाचन व लेखनाची आवड असल्याने आपले कर्तव्य बजावत अनेक काव्य, लेख आदी रचनांचे त्यांनी लेखन केले आहे.
दीपक मुंगसे यांच्या सेवानिवृत्ती सोहळा कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचा” ज्ञानोबा तुकोबा” पुरस्कार सन्मानित ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव, परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विश्वस्त प्रकाश काळे, उद्योजक सुधीर मुंगसे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. राम गावडे, सदस्य अनिल वडगांवकर, बाबुलाल घुंडरे, विलास सोपाना कुऱ्हाडे, संजय झुंबरलाल वडगांवकर, विठ्ठल शिंदे, दादासाहेब कारंडे, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडळी, परिवार, आजी-माजी विद्यार्थी, पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थीप्रिय प्राचार्य दीपक मुंगसे यांचा सन्मान करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.





