पुणे : राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील 903 पदांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल 30 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. भूमि अभिलेख विभागाच्या महाभूमि या संकेतस्थळावर हा निकाल उमेदवारांना पाहता येणार आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. भूकरमापक पदाच्या भरतीसाठी 34 हजार 532 उमेदवारांनी आॉनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी 30 हजार 656 उमेदवारांनी आॉनलाईन परिक्षा दिली. ही परिक्षा 13 नोव्हेंबर 2025 आणि 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रति दिन दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. पुणे विभागात भूकरमापकांची 83 पदे असून त्यासाठी 2 हजार 973 इतक्या उमेदवारांनी आॉनलाईन परिक्षा दिली. कोकण विभागातील 259 जागांसाठी 8 हजार 148 उमेदवारांनी, नाशिक विभागातील 124 जागांसाठी 4 हजार 340 उमेदवारांनी परिक्षा दिली. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील 210 जागांसाठी 8 हजार 276 उमेदवारांनी तर, अमरावती विभागातील 117 जागांसाठी 3 हजार 679 उमेदवारांनी अणि नागपूर विभागातील 110 जागांसाठी 3 हजर 240 उमेदवारांनी आॉनलाईन परिक्षा दिली आहे. आॉनलाईन परिक्षेस उपस्थित सर्व उमेदवारांचा विभागनिहाय गुणानुक्रमे निकला .30 जानेवारी 2026 रोजी https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबधित उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे भूमि अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.