Phaltan: आर्थिक शिस्तीसह संस्थेची प्रगती राखण्याची जबाबदारी, रणजितसिंह नाईक निंबाळकर
Phaltan जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती. विविध पक्षांकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी निश्चित करताना राजकीय गणिते जुळवावी लागली. मात्र, या प्रक्रियेला संघर्षाचे स्वरूप आले नसल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

Phaltan: बँकेची आर्थिक शिस्त जपणे, शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देणे आणि संस्थेची प्रगती कायम राखणे ही आगामी संचालक मंडळासमोरील महत्त्वाची जबाबदारी असेल असे मत नवनिर्वाचित संचालक माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रणजितसिंह म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील उत्तम बँक असून शेतकरी, सहकार क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात बँकेचे योगदान महत्त्वाचे आहे. ही परंपरा पुढे कायम ठेवण्याची गरज आहे. जागावाटपाच्या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बजावलेल्या भूमिकेचे स्वागत करताना महायुतीतील नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा झाली; मात्र कोणाच्याही मनात नाराजी नसल्याचे रणजीतसिंह यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती. विविध पक्षांकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी निश्चित करताना राजकीय गणिते जुळवावी लागली. मात्र, या प्रक्रियेला संघर्षाचे स्वरूप आले नसल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अन्य नेत्यांच्या सहभागातून समन्वय साधण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट करत निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महायुतीतील नेते एकत्रित भूमिका घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





