Reserve Bank of India | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) तीन सहकारी बँका आणि एका खासगी फायनान्स कंपनीवर लाखोंचा आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 22 डिसेंबर 2025 च्या आदेशानुसार, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2.10 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 20 आणि कलम 56चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. Reserve Bank of India | बँकेनं एका कंपनीला कर्ज मंजूर केलं होतं, ज्यात एक संचालक जामीनदार झाला होता. त्यावर बँकेनं दिलेल्या उत्तराचा, अतिरिक्त माहितीचा आणि तोंडी जबाबाचा विचार करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कोल्हापूर जिल्हा बँकेला 2.10 लाखांचा दंड केला आहे. Reserve Bank of India | वॅल्यूकॉर्प सिक्युरिटीज अँड फायनान्सवरही कारवाई याचप्रमाणे तेलंगणातील वारंगळ जिल्हा बँक व तामिळनाडूतील द सलेम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. ज्यात कर्ज प्रकरणांतील नियमांचे पालन न झाल्याचे तपासणीतून समोर आले आहे. याशिवाय वॅल्यूकॉर्प सिक्युरिटीज अँड फायनान्सवरही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना आवश्यक ग्राहक माहिती न सादर करणे, केवायसी नियमांचे उल्लंघन करणे आणि निश्चित मर्यादेपेक्षा जास्त रकमेची कर्ज हस्तांतरण केल्याचे आढळून आले आहे. हेही वाचा: “हिंदू तरुणांनी टिकून राहण्यासाठी ISIS सारखी संघटना स्थापन करावी,” ; यति नरसिंहानंद गिरी यांचे वादग्रस्त विधान