तापसी पन्नूच्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Haseen Dilruba 2 Release Date| बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस पडला. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट होता, ज्याच्या कथेने सर्वांची मने जिंकली. या चित्रपटात तापसीशिवाय विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. तापसी पन्नू आणि विक्रांत यांचा हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. चाहते सिनेमाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. अखेर आता ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
आता तापसी पन्नू पुन्हा एकदा सुंदर दिलरुबाच्या भूमिकेत परतणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’च्या निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तापसी पन्नू, विक्रांत मेसी, सनी कौशल आणि जिमी शेरगिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Netflix ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ची रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केले आहे. तर चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन आहे.
View this post on Instagram
‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर जुलै 2021 मध्ये झाला होता. यानंतर आता ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात तापसी पन्नू राणीच्या भूमिकेत होती आणि विक्रांत मॅसी तिच्या पतीच्या भूमिकेत ऋषभ सक्सेनाच्या भूमिकेत होता.
याशिवाय तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या कॉमेडी ड्रामा चित्रपट’ वो लड़की है कहां ‘मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा:
ज्या मुलाला समाजाने रिक्षावाल्याचा मुलगा म्हणत टोमणे मारले, त्या मुलाने आयएएस होऊन दिल ‘प्रत्युत्तर’





