बॉयकॉटला फाट्यावर मारत ‘पठाण’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई ! इतक्या कोटींचा गल्ला कमावत बाहुबली आणि केजीएफला देखील टाकले मागे

मुंबई -बहुचर्चित आणि वादग्रस्त असूनही पठाण चित्रपटाने छप्पर फाड कामे केली. प्रेक्षकांनी पठाणला भरभरून प्रेम देत थिएटर्सवर हाऊसफुलचे बोर्ड झळकावले. बॉयकॉटला अक्षरशः फटक्यावर मारत पठाणने चौथ्या दिवशी देखील चांगला गल्ला जमवला. तुफान ऍक्शन आणि शाहरुख खानची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर चालत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
बुधवारी म्हणजेच 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये हाऊसफुल झाल्याने चित्रपट मोठी करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पहिल्या दिवशी 57 कोटी दुसऱ्या दिवशी 70 कोटी अशी जबरदस्त ओपनिंग दिली. तिसऱ्या दिवशी कामे जरा घसरली असली तरी शनिवारी 55 कोटी कमावल्याने कमाईचा आकडा पुन्हा वाढला आणि चित्रपट थेट दोनशे कोटी कमाईच्या घरात गेला. तर जगभरात या चित्रपटाने तब्बल तीनशे कोटींचा गल्ला पार केला आहे. रविवारी हा चित्रपट चारशे कोटींचा गल्ला पार करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
‘PATHAAN’ OVERTAKES ‘KGF2’, ‘BAAHUBALI 2’… FASTEST TO ENTER ₹ 200 CR CLUB…
⭐️ #Pathaan: Day 4 [Sat]
⭐ #KGF2 #Hindi: Day 5
⭐ #Baahubali2 #Hindi: Day 6#India biz.#Pathaan is truly rewriting record books. pic.twitter.com/w5y07xKRnI— taran adarsh (@taran_adarsh) January 28, 2023
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसारखे स्टार्स आहेत.चित्रपटाला मिळालेले ग्रँड ओपनिंग पाहता शाहरुख खान भारताबरोबरच जगातील इतर देशांमध्येही तितकाच लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पठाणने बाहुबलीसह केजीएफ 2 ला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
पठाणमध्ये सलमान खानचाही कॅमिओ आहे. त्यामुळे गेल्या वर्षी भाईजानचा एकही चित्रपट आला नाही, म्हणूनच त्याला पाहण्यासाठी रसिकांनी सिनेमागृहात गर्दी केली. शाहरुख खानने ठीक ठिकाणी प्रमोशन करण्यासोबतच सोशल मीडियावरून थेट फॅन्सशी संवाद साधल्याने पठाणला चांगलाच फायदा झाल्याचे बोलले जात आहे.





