प्रभात वृत्तसेवा पुणे : गेल्या दोन दिवसांत तब्बल ९६९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने १,१६५ वैध उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. माघारीपूर्वी शहरातील ४१ प्रभागांमध्ये एकूण २,१३४ वैध उमेदवार होते. त्यापैकी ९,६९ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. तब्बल तीन वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय राजकीय पक्षांनी पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर न करता थेट इच्छुकांना एबी फाॅर्म दिले होते. त्यामुळे, अनेकांकडून एबी फाॅर्म मिळण्याआधीच अर्ज दाखल केले होते तर अनेक नाराजांनी नाराजी पक्षाला दाखविण्यासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते. त्यातील काही ठराविक इच्छुक वगळता बहुतांश बंडखोरांचे बंड मोडण्यात सर्वच राजकीय पक्षांना यश आले आहे. उमेदवारी माघारीनंतर बहुतांश प्रभागांमध्ये २० ते ४० उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अशी आहे स्थिती प्रभाग क्रमांक १ मध्ये ३६, ३ मध्ये २१ , ४ मध्ये २७, ५ मध्ये २१, ७ मध्ये ३४, ८ मध्ये २८, २७ मध्ये ३१ , ९ मध्ये २२, १० मध्ये २५, ११ मध्ये २९, १२ मध्ये २५, १३ मध्ये ३४, १४ मध्ये ३३, १५ मध्ये ३८, १६ मध्ये २९, १८ मध्ये २२, २० मध्ये २०, २१ मध्ये ३३, २२ मध्ये ३८, २३ मध्ये ३३, २४ मध्ये ३९, २५ मध्ये २३, २६ मध्ये ४०, २८ मध्ये ३२ , २९ मध्ये १६, ३० मध्ये १९, ३१ मध्ये १५, ३२ मध्ये २५, ३३ मध्ये २२, ३४ मध्ये २०, ३६ मध्ये २२, ३७ मध्ये २७, ३८ मध्ये ३६, ३९ मध्ये २२, ४० मध्ये २७ आणि ४१ मध्ये २७ उमेदवार अंतिम यादीत आहेत. प्रभाग २ आणि ६ मध्ये सर्वाधिक उमेदवार माघारीनंतरच्या अंतिम आकडेवारीनुसार प्रभागनिहाय उमेदवारांची संख्या वेगवेगळी आहे.प्रभाग क्रमांक २ आणि सहा मध्ये ४३ उमेदवार १७ मध्ये प्रत्येकी ४१ उमेदवार असून, प्रभाग क्रमांक १९ मध्ये ४० उमेदवार आहेत. त्यामुळे या प्रभागात प्रशासनास प्रत्येक मतदान केंद्रावर पाच ईव्हीएम लावाव्या लागणार आहेत. प्रभाग क्रमांक ३५ मध्ये दोन उमेदवार बिनविरोध झाल्याने उर्वरीत दोन जागांसाठी केवळ ७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.