सलमान खान याचं लग्न न करण्याच खरं कारण आलं समोर

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार ही चर्चा नेहमीच सुरू असते. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावही जोडलं जातं. त्यावर तो थातूरमातूर उत्तर देऊन वेळही मारून नेतो. त्यामुळे त्याच्या लग्नाविषयीचं कुतुहुल कायम वाढत जातं.

अनेक अभिनेत्रींशी सलमान खान याचं नावही जोडलं गेलं पण त्यापैकी कोणाशीही अद्याप त्याचं लग्न झालेलं नाही. संगीता बिजलानी हिच्यासोबत लग्न होणार म्हणून लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या, पण ऐनवेळी हे लग्न मोडले गेलं. यानंतरही अनेकदा सलमान सीरियस रिलेशनशीपमध्ये दिसनू आला मात्र नवरदेवाच्या रूपात त्याला पाहण्याचं त्यांच्या चाहत्याचं आणि कुटुंबियाचं स्वप्न अजूनपर्यत काही पूर्ण झालेलं नाही. सलमानचं अजूनपर्यत सिंगल रहाण्याच कारण आता समोर येत आहे.

माहितीनुसार, सलमान हा आपल्या व्यस्त कामकाजातून कुटुंबियांसाठी वेळ काढत असतो, कारण सलमान हा आपल्या कुटुंबियांवर खूप प्रेम करतो आणि त्यासाठी तो काहीही करू शकतो. या प्रेमाच्या पुढे त्याचं आणखी कोणासोबतचं प्रेम हे टिकू शकणार नाही. अनेकवेळा तो लग्न करण्याच्या जवळ होता, मात्र प्रत्येकवेळेस तो दुसऱ्या व्यक्तिला आपल्या कुटुंबापेक्षा जास्त महत्व देण्यात असमर्थ राहिला. सलमानला वाटतं की, आपल्या पार्टनरला वचन देणं आणि त्यानंतर आपला संपूर्ण वेळ आणि प्रेम त्या व्यक्तीला न देणं, हे चुकीचं ठरेल. आणि हेच ते कारण आहे, त्यामुळे सलमान अद्याप सिंगल आहे.

सलमानने विवाह करावा, अशी खुद्द त्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे. मात्र आपली होणारी जीवनसाथी त्याचं आपल्या कुटुंबियावर असलेलं प्रेम कधी समजू शकणार नाही, अशी भिती कायम सलमानला असते. आणि हीच भिती प्रत्येक वेळेस सलमानला लग्न करण्यापासून थांबविते. सलमान आपल्या कुटुंबियापेक्षा अधिक प्रेम दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीवर करण्याचा विचारसुध्दा करू शकत नाही आणि याच कारणांमुळे तो आपल्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न नेहमी करत असतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.