The Raja Saab: प्रभासचा बहुचर्चित चित्रपट ‘द राजा साहब’ गेल्या शुक्रवार, म्हणजेच ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. आधीपासूनच गाजत असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा प्रभाव अजूनही कायम असून त्याचा फटका ‘द राजा साहब’ला बसताना दिसतोय. तीन दिवसांतील कमाई ‘द राजा साहब’ला प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. पहिला दिवस (शुक्रवार): 53.75 कोटी रुपये दुसरा दिवस (शनिवार): 27.83 कोटी रुपये तिसरा दिवस (रविवार): फक्त 20 कोटी रुपये पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशीच चित्रपटाच्या कमाईत तब्बल 51 टक्क्यांची घट झाली. रविवारी तर कलेक्शन आणखी घसरले. 100 कोटींचा टप्पा पार चढ-उतार असूनही ‘द राजा साहब’ने भारतात आतापर्यंत एकूण 108.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. वर्ल्डवाइड कलेक्शन जागतिक पातळीवर पाहिल्यास, ‘द राजा साहब’ने 150 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मात्र तरीही बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ समोर हा चित्रपट टिकून राहू शकलेला नाही. सिनेमा हॉलमध्ये अजूनही ‘धुरंधर’चाच दबदबा दिसून येतो. प्रभाससारखा मोठा स्टार असूनही ‘द राजा साहब’ची गती मंदावलेली आहे. येत्या दिवसांत चित्रपटाची कमाई वाढते की आणखी घसरण होते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.