बिंगो जुगारावर छापा टाकून सात जणांना अटक

कोठला राज चेंबर्स परिसरात कारवाई

नगर – बिंगो जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. कोठला परिसरातील राज चेंबर्स येथे बुधवारी (दि.1) रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी नितीन कान्होबा घोडके (रा. देवी रोड, केडगाव), सलीम मकबूल शेख (रा. बेलदारगल्ली), आयुब गुलाब शेख (रा. घासगल्ली, कोठला), रवींद्र मोतीराम भिंगारदिवे (रा. फलटण चौकीमागे, कोठला), अस्लम कुतुबुद्दीन शेख (रा. जुना मुकुंदनगर), शुभम बाबासाहेब काळे (रा. कायनेटीक चौक), सुमित सुनील कांबळे (रा. इंदिरानगर, भिंगार) यांना अटक केली आहे. सदर बिंगो जुगार अड्ड्यावर 1 हजार 150 रुपये रोख व जुगार खेळण्याचे 7 मशीन असा एकूण 78 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कोठला येथील राजे चेंबर्स परिसरात बिंगो जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यावरून तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुलाणी यांच्यासह पोलीस पथकाने बुधवारी सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तसेच 7 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस नाईक मंगेश खरमाळे यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. पी. मेढे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.