माजी शिक्षकांची भावना ः शिक्रापुरात भरली तब्बल 31 वर्षांनंतर शाळा
शिक्रापूर -छडीच्या धाकाच्या शिक्षेमुळे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झाले असून छडीची शिक्षा विद्यार्थ्यांना कामी आली असल्याचे मत माजी शिक्षक सर्जेराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
सन 1988 – 1989 मध्ये शिक्षण घेऊन दहावी उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. शिक्रापूर येथे तब्बल 31 वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे चेहेरे आनंदी, काहीशा भांबावलेल्या स्थितीमध्ये होते.
यावेळी माजी उपसभापती अनिल भुजबळ, येरवडा कारागृहाचे दता चव्हाण, उमेश भिवरे, जितेंद्र साळुखे, संतोष भुजबळ, गणेश दळवी, तात्यासाहेब चव्हाण, भारती मांढरे, सुनिता सातकर, नलिनी घारे, जयश्री गावडे, रंजना घोलप, मंदा आढाव, संध्या जगताप, संजीवनी सासवडे, सुनंदा भुजबळ, आशा सासवडे यांसह माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच दिनकर सासवडे, किसन विरोळे, विठाबाई वाघोले, पांडुरंग जकाते, ज्ञानेश्वर भुजबळ, विद्याधाम प्रशालेचे माजी प्राचार्य एल. टी. कुलकर्णी यांसह अन्य गुरुजंनाना श्रद्धांजली अर्पण आली.
या मेळाव्यात शंभरहून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. तर यावेळी श्रीधर टेमगिरे, मालन टेमगिरे, ज्येष्ठ शिक्षक बाबूराव साकोरे, रमेश ठाकूर, एम. के. शेळके, सर्जेराव गायकवाड, सोपान टेमगिरे, सूर्यकांत शिर्के या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. अनेक माजी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नरेश कर्पे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, बालरंगभूमीचे सदस्य राजाराम गायकवाड, कैलास कोठावळे यांसह आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या कामासाठी पंचवीस हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शैला कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी केले तर शैला कांबळे यांनी
आभार मानले.