वाघोलीत वार्ड क्र.1 मधील सांडपाण्याचा प्रश्न सुटला

वाघोली(प्रतिनिधी) : वाघोलीत वार्ड क्र.1 मधील अत्यंत महत्वाचा सांडपाण्याचा प्रश्न सुटला असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी दिली आहे.
वार्ड क्रमांक 1 मधे कल्पक होम्स,सोलासीया ते बाईफ रोड पर्यंत आतील ड्रेनेज लाईन चे काम पुर्ण झाले असल्याने कल्पक होम्स,सोलासीया, फेज 1, फेज 2, गुलमोहर,गंगा अल्फा पॅराडाईस,सुप्रिम आंगन या परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न सुटल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत असल्याचे भाडळे यांनी सांगितले.
“अनेक वर्षापासुन रखडलेले मुलभुत प्रश्न जसे मजबूत रस्ते, पथदिवे ,कचरा व्यवस्थापन, सांडपाणी असे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे.
-महेंद्र भाडळे (उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली)
याशिवाय बाईफ रोडची मुख्य ड्रेनेज लाईन साठी अनेक अडथळे येत असताना सर्व समस्या दूर करुन ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी माजी जि.प.सदस्य रामभाऊ दाभाडे,सरपंच वसुंधरा उबाळे,ग्रा.पं. सदस्य शिवदास उबाळे,पुजाताई भाडळे,माजी उपसरपंच समीर (आबा) भाडळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 2 कोटी 50 लाख रु. इतका मोठा ग्राम निधी उपलब्ध करुन जवळपास या भागातील 70% काम पूर्ण करून या परिसरातील देखील सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यात यश मिळाले आहे.
“वाघोली मधील पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, अंतर्गत मजबूत रस्ते, पथदिवे तसेच नागरिकांसाठी इतर सोयी सुविधा देण्यासाठी गेल्या आठ वर्षापासून ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार निधी, खासदार निधी यांच्यामार्फत विकास कामे केली आहेत. यापुढील काळात देखील नागरिकांच्या सेवेसाठी हा पाठपुरावा सुरू राहणार आहे.
– समीर भाडळे(माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली)
मात्र या ठिकाणचे उर्वरित काम बाकी असून त्याचा देखील पुणे मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून त्याला देखील मनपा प्रशासन अनुकूल असल्याचे उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या भागातील मुळीक लक्जरीया, बी ए वरमोंट, दाभाडे वस्ती, दत्तप्रसाद नगर, आयवरी, सवन्ना, सिल्वर स्प्रिंग, वाईल्डवुड, अक्षय संस्क्रुती, वास्तु गोल्ड, कांचन पुरम सिध्दीविनायक नगरी, आयरीस या भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात यश आले आहे.





