ऩवी दिल्ली – जगभरासह देशात १४ एप्रिल रोजी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असते. या दिवशी दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी येथे पंतप्रधानांच्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. मंगळवारी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संग्रहालय मागील सर्व पंतप्रधानांचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करेल. “मोदींनी सांगितले की प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान असून ते विसरले जाणार नाही” असे या बैठकीत उपस्थित असलेल्या भाजप खासदाराने सांगितले.
पहिल्यांदा मार्च 2020 पर्यंत पूर्ण केले जाणार होते. परंतु या प्रकल्पाला अनेक कारणांनी विलंब झाला. 2019 मध्ये डिझाइनचे प्रस्ताव न आवडल्याने सरकारने पहिली बोली परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2020 मध्ये कोविड आणि 2021 मध्ये मुसळधार पावसाचा सामना करावा लागला होता.
असे असणार पंतप्रधानांचे संग्रहालय
-तीन मजली 10,975 स्क्वेअर फूट म्युझियम
– आता पर्यंतच्या पंतप्रधान यांची कारकीर्द
– सिक्का असोसिएट्स हे म्युझियम बनविणार
– प्रकल्पाची किंमत 271 कोटी रुपये इतकी