मॉरीशसमधील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार

नवी दिल्ली – मॉरीशसमधील सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समपदस्थ यांच्या हस्ते होणार आहे. दूरदृश्‍य प्रणालीद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमात दोन्ही देशातील मान्यवर आणि कायदेतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

भारताने 2016 मध्ये मॉरीशसला विशेष आर्थिक पॅकेज म्हणून 353 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी दिला असून त्यामधून मॉरीशसमध्ये पाच महत्त्वाचे प्रकल्प आकाराला येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीची उभारणी हा त्यातीलच एक प्रकल्प आहे.

मालदीवमध्ये मंगळवारी नऊ सामुदायिक विकास प्रकल्प राबवण्याची घोषणाही भारताने केली. भारतीय राजदूत सनजे सुधीर यांनी माले येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या एका समारंभात 5.6 दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रतीकात्मक धनादेश सुपूर्द केला, परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद आणि संसद सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.