पंतप्रधान आज पुन्हा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार
Updated On:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या वेळी करोनाचा फैलाव रोखणे, स्थलांतरितांचा प्रश्न आणि तबलिग जमातमध्ये सहभागी झालेल्यांच्या संपर्कात कोण आले या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता या बाबतही मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोनाची लागण आणि त्याच्याशी संबंधित प्रश्नांवर दोन आठवडय़ांच्या कालावधीत होणारी ही दुसरी तर केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर होणारी ही पहिलीच चर्चा आहे.
मरकझ निझामुद्दीन येथे जमलेल्यांना शोधून क्वारण्टाइन करणे आणि चाचण्या घेणे या बाबत अनेक राज्यांमध्ये काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





