Today Silver Prices – जागतिक पातळीवरील भूराजकीय तणाव, व्यापार युद्ध आणि अमेरिकेत होणार असलेली व्याजदर कपात, या कारणामुळे सोने आणि चांदीच्या दरत एकतर्फी वाढ होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या रिझर्व बँकेदरम्यानचा संघर्ष वाढत असल्यामुळेही या दोन धातूच्या दरात वाढ होत असल्याचे विश्लेषकानी सांगितले. परिणामी दिल्ली सराफात सोमवारी एकाच दिवशी चांदीचा दर 6 टक्क्यानी म्हरजे 15 हजार रुपयानी वाढून 2 लाख 65 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. ही चांदीच्या दराची विक्रमी पातळी आहे. चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल सहा टक्के वाढ होण्याची ही अपवादात्मक घटना समजली जाते. दिल्ली सराफात सोन्याचा दर एकाच दिवसात 2,900 रुपयांनी म्हणजे 2.05 टक्क्यांनी वाढून 1 लाख 44 हजार 600 रुपये या नव्या विक्रमी पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर दोन टक्क्यांनी म्हणजे 90 डॉलरने वाढून 4,601 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर गेला. जागतिक बाजारात चांदीचा दर 4.3 डॉलरने म्हणजे 6% वाढून 84.61 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर गेला. विश्लेषकांनी सांगितले की, अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन फेडरल रिझर्वला पुन्हा एकदा व्याजदर कपात करणे भाग पडणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थातच यामुळे महागाई वाढणार आहे. या महागाईचा सामना करण्यासाठी या दोन धातूची गुंतवणूकदाराकडून खरेदी वाढत आहे. त्यातच भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे भारतात या दोन धातूचीा आयात महागत पडत असल्यामुळे किमती वाढत आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण करून तेथील तेल विहिरी ताब्यात घेतल्यानंतर अमेरिका पुन्हा इराण मध्ये हस्तक्षेप करण्याच्या तयारीत असल्याचे समजले जाते. या सर्व घटनाक्रमाचा या दोन धातूच्या दरावर परिणाम होत आहे असे विश्लेषकांनी नमूद केले.