ओमिक्रॉन क्रिप्टोचा भाव वधारला
Updated On:

मुंबई- या अगोदर व ओमिक्रॉन नावाची क्रिप्टो करन्सी अस्तित्वात होती. मात्र गुंतवणूकदारांचे तिच्याकडे फारसे लक्ष नव्हते. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या नव्या विषाणूला ओमिक्रॉन हे नाव दिल्यानंतर ओमिक्रॉन क्रिप्टो करन्सीच्या दरात गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे.
27 नोव्हेंबर रोजी या करन्सीचा दर केवळ 65 डॉलर होता. तो आता 689 डॉलर इतका झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नव्या विषाणूला या करन्सीचे नाव दिल्यामुळे या करन्सीत काही गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे.



