Gold Rates : सोन्याच्या दरात झाली घट; जाणून घ्या…आजचा दर

नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 153 रुपयांनी कमी होऊन 55,650 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर सात रुपयांनी कमी होऊन 68,700 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,839 डॉलर व चांदीचा दर 23.46 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. जागतिक पातळीवर बरीच गुंतवणूक डॉलर आणि अमेरिकेतील कर्जरोख्याकडे जात असल्यामुळे सोन्याची मागणी कमी होऊन सोन्याचा दर कमी होत असल्याचे विश्लेषकांनी सुचित केले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/stock-indices-fall-for-third-day-in-a-row/
दरम्यान, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत असल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 452 अंकांनी कमी होऊन 59,900 अंकावर बंद झाला.
बऱ्याच दिवसानंतर सेन्सेक्स 60,000 अंकाच्या खाली आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 132 अंकांनी म्हणजे 0.74 टक्क्यांनी कमी होऊन 17,859 अंकावर बंद झाला.





