सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे मोदींना पाचारण

नवी दिल्ली- २०१९ लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर आज राजधानी दिल्लीत भाजप आणि एनडीएच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. याबैठकीत एनडीए सरकारच्या सर्वच खासदारांनी हजेरी लावली असून, एनडीएच्या नेतेपदी ‘नरेंद्र मोदी’ यांची निवड करण्यात आली. शिवाय, एनडीएच्या 353 खासदारांनी देशाच्या पंतप्रधानपदासाठी ‘नरेंद्र मोदी’ यांच्या नावाला एकमतानं समर्थन दिलं.

दरम्यान, मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. त्यावर राष्ट्रपतींनी मोदींना नवं सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं आहे. तसेच राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदी नियुक्ती केली असून, राष्ट्रपतींनी मोदींना आपल्या शपथविधीची तारीख आणि वेळ कळवायला सांगितली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.