Eknath Shinde : धनुष्यबाणाची ताकद वाढली! भाजपला मोठा धक्का; ‘उबाठा’ गटाचे उपजिल्हाप्रमुख शिंदेसेनेत दाखल
Eknath Shinde : भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

Eknath Shinde : डोंबिवलीतील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले.
हेही वाचा : Donald Trump : ‘या दिवशी सुरू होणार स्ट्रेट ऑफ होर्मुज’; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले? पाहाच….
दरम्यान, राज्य सरकारने नुकतीच पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर केली आहे. तब्बल 14 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेत अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीबाबतही सकारात्मक संकेत दिले. शिवसेनेच्या दोन जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करत सरकारवर सर्वांचा विश्वास असल्याने याबाबत अनुकूल निर्णय होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानंतर शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तर श्रीकर चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. आता त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
हेही वाचा : Ratnagiri News : रत्नागिरीत खळबळ! लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ACBच्या जाळ्यात






