मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचार सभेदरम्यान विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. भोके पडलेला फुगा जसा असतो त्याप्रमाणे आज विरोधी पक्षांची स्थिती असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
"भोकं पडलेला फुगा असतो तशी अवस्था विरोधी पक्षाची झाली आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/JuoP6yf29r— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 9, 2019
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही चोरून कामे करत नसल्याचा खोचक टोमणा मारला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधताना जर देशद्रोहाचा गुन्हा काढून टाकला तर, उद्या कुख्यात आरोपी दाऊद भारतात येऊन कांग्रेसचे नेता बनेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर फटकेबाजी करताना “राहुल गांधी हे नालायक कारटं उद्या देशाचा पंतप्रधान म्हणुन चालेल का?” असा सवाल उपस्थित केला.
"राहुल गांधी हे नालायक कारटं उद्या देशाचा पंतप्रधान म्हणुन चालेल का?"
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/EzWHd169Di— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 9, 2019