मायणी – तुम्ही सांगाल ते धोरण, तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्हीच आमचे सिल्व्हर ओक आणि देवगिरी अशी भावना कार्यकर्त्यांनी सुरेंद्र गुदगे यांच्याकडे व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत फुटीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक वडूजच्या मायणी अर्बन बॅंकेच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य सुरेंद्र गुदगे, वडूजच्या नगरसेविका आरती काळे व राधिका गोडसे, खरेदी विक्री संघाचे संचालक विकास साबळे, मायणी अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष दीपक देशमुख, विद्यमान संचालक भाऊसाहेब लादे, काकासाहेब घाडगे, भीमराव घोडके, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पवार व माजी सदस्य मोहन बुधे, जेष्ठ नेते श्रीमंत पाटील, मार्केट कमिटी संचालक गिरीश शहा, संकेत म्हामणे, शैलेंद्र वाघमारे व स्वप्निल घाडगे, कळंबीचे माजी पंचायत समिती सदस्य मधुकर काळे, कातरखटावचे बाळासाहेब पाटील, प्रकाश नलवडे, ऍड. संतोष पवार, विखळेचे माजी सभापती शशिकांत देशमुख, खादी ग्रामोद्यागचे संचालक रघुनाथ जाधव व शरद कांबळे उपस्थित होते. यावेळी शशिकांत फडतरे, विकास साबळे, शंकर फडतरे, मारुती दबडे, सयाजी पाटील, नंदकुमार डोईफोडे, रमेश पाटील, महादेव शिंदे, नितीन घाडगे, सोमनाथ येवले, विजय शेटे, चंद्रकांत सानप, जयवंत सानप, अतुल देशमुख, सोमनाथ पवार, सुखदेव पवार, संजय शिंदे, वसंत यलमर, अभिजीत येवले, संतोष चव्हाण, संजय नलवडे, युवराज बिटले, अशोक निंबाळकर, प्रकाश घाडगे, संदीप शिंदे, वैभव इंगळे, भीमराव मोरे, माजी सरपंच दादासो निकम, बापूराव घाडगे, शिवाजी साबळे, नितीन जाधव, बाबा शेलार या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. ज्यांनी राष्ट्रवादीस जन्म दिला, त्या बापाच्या विरोधात कसे जायचे?, तर काहींनी विकास कामाच्या दृष्टीकोनातून सत्तेसोबत जाण्याचा विचार व्यक्त केला. तुम्हास जिथे ताकद देतील, तो निर्णय घ्या असे विचार काहींनी व्यक्त केले. तालुक्यातील काही नेत्यांनी सामान्य कार्यकर्त्यांला न विचारात घेता मुंबईत हजेरी लावली. मात्र, सुरेंद्र गुदगे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका घेतली. निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वाधिकार सुरेंद्र गुदगे यांना दिले. त्या निर्णयासोबत राहण्याचा शब्द कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. यावेळी मारुती यादव, प्रकाश मोहिते, नामदेव पाटील, राजेंद्र फडतरे, विजय जगदाळे, सदाशिव खाडे, आप्पासाहेब लिगाडे, बाबूराव पवार, सूर्यकांत तरसे, विक्रम डोईफोडे, अनिल जाधव, अनिल सावंत, अशोक जाधव, सयाजी पवार आदी प्रमुख उपस्थित होते.