मुलगी झाली म्हणून छळ

सांगवी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांविरोधात तक्रार

पिंपरी – औद्यगिक आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या फियादीवरुन पती, सासरे व जाऊ यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाकडून सातत्याने “बेटी बचाव, बेटी पढाव’ या सारख्या मोहीम राबवण्यात येत असून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी पिंपरी-चिंचवड सारख्या प्रगत शहरात मुलींचा जन्मदर सातत्याने घटत असलेला पहायला मिळत आहे. ही परिस्थिती चिंताजनक असतानाच शहरातील सांगवी भागामध्ये मुलगी झाली म्हणून विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे.

या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महिला व आरोपीचा प्रेमविवाह झाला आहे. प्रेम विवाह झाल्यापासूनच फिर्यादी महिलेला तिचा मोहन मल्लभुपाल नाटेकर, सासरे मल्लभुपाल नाटेकर, जाऊ कविता होनेश नाटेकर हे लोक महिलेला त्रास देत होते. अखेर या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पोलिसांत धाव घेतली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी, आळंदी येथे हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

शहरातील भोसरी 27 वर्षीय विवाहित महिलेला माहेरुन हुंडा आणण्याची मागणी करीत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला शाम चव्हाण, सासरे दादाराम चव्हाण, सासू नंदा चव्हाण, गणेश चव्हाण, उर्मिला चव्हाण यांनी मारहाण केली. तसेच तिला उपाशी ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. याप्रकरणात महिलेच्या फिर्यादीवरुन भोसरी पोलिस ठाण्यात फिर्यादी महिलेचा पती, सासु-सासरे, जावू व नंदाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत आळंदी येथेही विवाहित महिलेला पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती तुषार कुऱ्हाडे, सासरे बाळासाहेब कुऱ्हाडे, सासू प्रतिभा कुऱ्हाडे, दीर पंकज कुऱ्हाडे यांच्या विरोधात आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.