Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीची जोडी ‘या’ सिनेमात झळकणार ; कारण २४ जानेवारीच महत्व आहे खास, व्हिडिओ समोर

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फस्टक्लास दाभाडे’ हा सिनेमा येत्या २४ जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसणार आहे. या सिनेमाची चर्चा होत असून सिद्धार्थची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर त्याच्या सोबत प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहे. ते दोघ त्यांच्या सोशल मीडियावर अॅटिव्हेट असतात. सिदार्थ आणि मिताली या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. या सिनेमातून स्क्रीन शेअर करणार असल्याने सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. मात्र, त्यांच्या आयुष्यात २४ जानेवारीच महत्व खास असल्याने त्याची पोस्ट सिद्धार्थने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केली आहे.
सिद्धार्थची पोस्ट
यानंंतर सिद्धार्थने त्याच्या लग्नातील व्हिडीओ शेअर केला असून, “२४ जानेवारी २०२१ – लग्न, २४ जानेवारी २०२५ – पहिला सिनेमा एकत्र, फसक्लास होणार सगळं!” असं कॅप्शन दिलं आहे. यावर एका नेटकऱ्याने, “तुमचा साखरपुडा सुद्धा २४ जानेवारीलाच झाला होता ना?” असा प्रश्न सिद्धार्थला केला. यावर त्याने ‘२४ जानेवारी २०१९’ असं उत्तर दिलं. यामुळेच ही तारीख सिद्धार्थ आणि मितालीसाठी खास आहे.
या चित्रपटातलं लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात प्रेक्षकांना मितालीची झलक पाहायला मिळाली. सिद्धार्थ-मितालीने हे गाणं शेअर करत याला, “आमचा पहिला सिनेमा एकत्र” असं कॅप्शन दिलं होतं.
३४ जानेवारी २०२१ रोजी सिद्धार्थ आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडला होता. याच दिवशी २४ जानेवारी २०२५ मध्ये फस्टक्लास दाभाडे हा सिनेमा रिलीज होत आहे. विशेष म्हणजे २४ जानेवारी २०२९ या दिवशी सिद्धार्थ आणि मितालीचा साखरपुडा झाला होता. यामुळे या तारखा त्यांच्यासाठी खूप खास आहेत.





