विजयाचा भगवा रंग…
Updated On:

भगव्या रंगाची उधळण, शुभेच्छांचे फलक, डीजेचा दणदणाट आणि आनंदाने नाचणारे कार्यकर्ते…शहरातील भाजप कार्यालयाबाहेर तसेच भाजप उमेदवारांच्या घराबाहेर अशाप्रकारचे उत्सवी वातावरण दिसत होते. मात्र, या उत्सवाला काही काळासाठी पावसाची अडथळा आला. त्यामुळे दुपारी विजय घोषित होऊनही काही उमेदवारांना अपेक्षित जल्लोष करता आला नाही.
निवडणूक निकालांचा कल जसजसा येत होता, तसतसे उमेदवारांच्या विजयाचे चित्र स्पष्ट होत होते. हा क्षण साजरा करण्यासाठी उमेदवारांच्या घरी तसेच पक्षकार्यालयात विजयोत्सव साजरा केला जात होता.
कसबा मतदार संघात केसरीवाडा, जंगली महाराज रस्ता, तांबडी जोगेश्वरी मंदिर अशा विविध ठिकाणी मुक्ता टिळक यांना विजयाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. तर जोगेश्वरी मंदिर येथे नागरिकांना निकाल पाहता यावा, यासाठी स्क्रीन लावण्यात आले होते.





