पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून आज (रविवारी) करोनाबाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या 4 वर्षांच्या मोठ्या भावास 14 दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. हे दोघांनी करोनाशी यशस्वी लढा देत करोनावर मात केली आहे. मुंबईला बाळंतपणासाठी गेलेली आई एक महिन्याने आपल्या मुलासह पुण्यात परतली होती. दरम्यान बाळाला ताप आल्यामुळे “वायसीएम’ रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता एक महिन्याचे बाळ व मोठा भाऊ दोघेही पॉझिटीव्ह आले, तसेच त्यांचे आजोबाही पॉझिटिव्ह आले होते. तर आईचा अहवाल निगेटीव्ह आला होता. “वायसीएम’ रुग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज ही दोन्ही बालके करोनामुक्त झाली.