खर्डा येथे करोनाबाधितांची संख्या अर्धशतकाकडे
Updated On:

शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू
खर्डा (वार्ताहर) – जामखेड तालुक्यातील खर्डा येथील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती साखळी थांबवण्यासाठी खर्डा गावातील लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी, ग्रामस्थांनी रविवार (दि. 23) ते गुरुवार (दि.27) पाच दिवस स्वच्छेने गाव बंदचा निर्णय घेतला आहे.
खर्डा शहरात आत्तापर्यंत 49 करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून रोज येणारी आकडेवारी धडकी भरणारी येत असल्याने शहर काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चिंतेची बाब म्हणजे शहरातील प्रत्येक वार्डात करोनाबाधित रुग्ण निघत असल्याने चिंताजनक आहे. नागरिकांनी करोना नियमांचे पालन करावे, तोंडाला मास्क बांधावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, यामुळे करोना साखळी तोडण्यास मदत होईल, असे आवाहन खर्डा गावचे सरपंच संजय गोपालघरे यांनी केले.





