वाघोली : वाघोलीतील कोरोना रुग्णांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून कोरोना रुग्णांच्या आकड्याने पन्नाशी ओलांडली असून वाघोलीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५३ झाली आहे.
यापैकी २२ रुग्ण बरे झाले आहेत तर ३१ रुग्ण अॅक्टीव आहेत. ६ जुलै रोजी कोरोना रुग्णांची संख्या आठने वाढली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये वाघोली ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचाचा देखील समावेश आहे. केसनंदमध्ये आणखी एक रुग्ण सापडला असून येथील २ रुग्ण अॅक्टीव आहेत.