पुढील आयपीएल व इंग्लंडविरुद्धची मालिकाही अमिरातीत
Updated On:

करोनामुळे बीसीसीआय व अमिराती संघटनेत करार
दुबई – यंदाची आयपीएल स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे भारताऐवजी अमिरातीत होत असून पुढील वर्षी होत असलेली आयपीएल स्पर्धा तसेच इंग्लंडची भारताविरुद्धची मालिकाही येथेच आयोजित केली जाणार आहे. याबाबतचा करार बीसीसीआय व अमिराती क्रिकेट संघटनेदरम्यान झाल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
करोनाचा धोका वाढल्याने भारतात ही स्पर्धा घेता येत नसल्याने त्याचे आयोजन अमिरातीत करण्यात आले. त्याचवेळी हा धोका पुढील वर्षीही कायम राहिला तर पर्यायी ठिकाण हातात असावे या विचाराने हा करार करण्यात आला आहे. हा करार जाहीर करताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि खजिनदार अरुण धुमाळ हेदेखील हजर होते.





