आयपीएलमधील नवा संघ लखनौ सुपर जाएंटस
Updated On:

लखनौ – इंडियन प्रीमियर लीगमध्ये नव्याने समावेश झालेल्या लखनौ फ्रॅंचाईजीने आपल्या संघाचे ‘लखनौ सुपर जाएंटस’ असे नामकरण केले आहे. आपल्या संघाचे नाव निश्चित करण्यासाठी ‘नाम बनाओ नाम कमाओ’ अशी मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये लाखहून अधिक व्यक्तींनी सहभाग घेतला. त्यातून या नावाची निवड करून त्या नावाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, असे गोएंका यांनी सांगितले.
लखनौ फ्रॅंचाइजीने क्रिकेट चाहत्यांकडून मागावलेल्या नावातून या नावाची निवड केली. आरपीएसजी समूहाकडे या संघाची मालकी आहे. मालक संजीव गोएंका यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या नावाची घोषणा केली.
ही मोहिम सोशल माध्यमावरून ३ जानेवारीपासून राबविण्यात आली होती. या नव्या संघाचे नेतृत्व यापूर्वीच केएल राहुल याच्याकडे सोपविण्यात आले आहे.





