पुणे – रुग्णालय आणि रुग्ण यांच्यातील वाद वारंवार रस्त्यावर येत असतील, तर दोष केवळ व्यक्तींचा नसून त्वरित, निपक्ष आणि विश्वासार्ह निर्णय देणारी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नसणे हे त्यामागचे मुख्य कारण आहे. वैद्यकीय कायदा २०१० मधील कलम ७ अंतर्गत राज्यात स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना झाल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि राज्य यांच्यातील घटनात्मक समतोल राखण्यास मदत होईल,” असे मत ॲड. श्रीकांत ठाकूर यांन व्यक्त केले. त्यांनी पाठवलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, प्राधिकरणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी लवकरच वकिलांची एक तज्ञ समिती तयार केली जाईल. दरम्यान हडपसर येथे रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्यांना न्यायालयाने जामिन देत दिलासा दिला आहे. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. प्रियंका जाधव-काटकर, ॲड. श्रद्धा प्रकाश जाधव, ॲड. कुणाल सोनवणे आणि ॲड. अर्थव पिंगळे यांनी न्यायालयात युक्तिवाद सादर केला.