भविष्यातील युध्दाचे स्वरूप पूर्णत: वेगळे असेल; तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती…

नवी दिल्ली – करोनाच्या महामारीने अख्ख्या जगात हाहाकार उडाला. यापुढे दहशतवादी संघटना जैविक अस्त्र म्हणून करोना व्हायरसचा वापर करू शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. करोनानं जगभरात आतापर्यंत 20 लाखांहून अधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे भविष्यात करोना व्हायरसचा वापर दहशतवादी रासायनिक हल्ल्यासाठी करू शकतात, अशी भीती सुरक्षा तज्ज्ञांना वाटते आहे.

भविष्यात युद्धाचे स्वरूप बदलणार असून, रासायनिक किंवा जैविक हल्ले जगात ठिकठिकाणी होऊ शकतात, अशी शक्‍यता शस्त्रास्त्र विशेषज्ञ हामिश डी ब्रेटन गॉर्डन यांनी व्यक्त केली आहे.
याआधी कोरोना व्हायरस म्हणजे चीनने बनवलेले जैविक अस्त्र असल्याचा आरोप झाला होता.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये करोना व्हायरसचा जन्म झाला, असा संशय व्यक्त केला गेला. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या चौकशीत याबाबतचे ठोस पुरावे आढळले नाहीत. मात्र करोनाच्या निमित्ताने अशाप्रकारच्या जैविक अस्त्राचा भविष्यातील युद्धासाठी वापर होऊ शकतो, हे स्पष्ट झाल्याचे मानले जाते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.