सामूहिक अत्याचार प्रकरणाचे गुढ वाढले

आठवडाभरानंतरही अद्याप धागेदोरे नाहीत

पिंपरी  – शिक्षणाकरिता पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेला आठवडा उलटून गेला तरी पोलिसांना अद्याप याबाबत धागेदोरे हाती लागलेले नाहीत. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास टिळक चौक येथून पायी चाललेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून तिला रिक्षातून अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेला दहा दिवस झाले तरी मात्र आरोपींचे धागेदोरे अद्याप सापडलेले नाहीत. या घटनेची उकल होण्यासाठी टिळक चौकातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात पीडित तरुणी कोठेही दिसत नाही. तरुणीच्या मोबाइलचे लोकेशन निगडीतीलच आहे. मात्र टिळक चौकातील नाही. संबंधित तरुणीचा पूर्वीचा आणि आताचा जवाब बदलला आहे. त्या तरुणीला वारंवार चक्‍कर येत असल्याने पोलीस अधिक विचारणा करू शकत नाहीत. यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

“सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी सुरू आहे. तपासात विशेष असे यश मिळालेले नसले तरी लवकरच आम्ही या गुन्ह्याची उकल करू.’
– सुनील टोणपे, वरिष्ठ निरीक्षक, निगडी पोलीस ठाणे 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)