डॉ काफील खान यांच्या निकटच्या नातेवाईकांची हत्या
Updated On:

गोरखपुर : सीएए कायद्याच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याच्या कारणाखाली अटक करण्यात आलेले डॉ काफील खान यांच्या एका निकटच्या नातेवाईकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उत्तरप्रदेशात घडला आहे.
डॉ नुसरतुल्ला वारसी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते 55 वर्षांचे होते. ते आपल्या वकिलाशी चर्चा करून घराकडे परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ते प्रॉपर्टी डिलर होते. पैशाच्या वादातून त्यांची हत्या झाली असावी असा पोलिसांचा कयास आहे. तथापी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पोलिसांची तीन पथके स्थापन केली आहेत.





