नवी दिल्ली- २०१९ लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदारांवर सध्या शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे. अश्यातच बसपाचे खासदार ‘अतुल राय’ यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. अतुल राय यांच्यावर एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा गुन्हा आहे. संबंधित पीडित मुलीने राय यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशानंतर अतुल राय फरार झाले होते. राय यांनी न्यायालयाकडे 23 मे पर्यंत दिलासा देण्याची विनंती केली होती. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटली असून, याप्रकरणी सोमवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता, अतुल राय यांना संसदेच्या ऐवजी प्रथम तुरुंगाची पायरी चढावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील घोसी लोकसभा मतदारसंघातून अतुल राय विजय झाले आहेत.